अनेक रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीतच
शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून महानगरपालिकेला निधी प्राप्त झाला पण शहर बस वगळता एकही ठळक झाल्याचे तिथून येत नाही. शहर विकासासाठी प्रशासन कोट्यवधींची फक्त घोषणा करत असून रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.शासनाने निधी देऊनही पालिकेला रस्त्यांची कामे पूर्ण करता आली नाही. बीड बायपास, जालना रोडचा प्रश्न प्रशासन सोडवू शकले नाही.त्यामुळे मनपा प्रशासन ढेपाळल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे .त्यामुळे मनपाने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी शंभर कोटींचा निधी शहरातील खड्ड्यांसाठी दिला होता. मनपाला निधी प्राप्त झाला पण रस्त्यांची यादी करण्यात येथील राजकारण्यांना एक वर्ष लागले. त्यानंतर निविदा प्रक्रियेला सहा महिने लागले. त्यानंतर दीड वर्षांपासून रस्त्यांची कामे सुरू आहेत पण ते अद्याप पूर्ण झालेली नाही. अजूनही अनेक रस्ते अर्धवट स्थितीत आहे. कोरोनाचे निमित्त करून कंत्राटदाराने कामे बंद केली हे निमित्त ही मनपाला मिळाले आहे. राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी आणखी 150 कोटींचा निधी देऊ केला त्यातून करावयाच्या रस्त्यांची यादी ही मनपाने नेहमीप्रमाणे उशीराच दिली. अगोदर दिलेल्या निधीतून रस्त्यांची कामे झाली नसल्याने शासनाने निधी दिला नाही. नंतर सत्तांतर झाले पण मध्येच कोरोना संसर्ग वाढल्याने सर्व कामे ठप्प झाली.
मनपा प्रशासनाकडून विकास कामे करण्यात दिरंगाई होत असल्याने शहराचा विकास रखडला आहे .शहरातून जाणारा बीड बायपास रोड मृत्यूचा सापळा झाला आहे. रस्त्याचा बाजूचा सर्विस रोड व्हावा यासाठी नागरिकांनी आंदोलन केले.पण आजही सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
स्मार्ट सिटीत शहराचा समावेश झाला. निधी मिळाला.मात्र शहराला अजूनही स्मार्टपणा आलेला नाही. रस्ते चांगले झाले तर शहराच्या सौंदर्यात भर पडेल.